खाण कंपन्यांकडून सरकारी तिजोरीत साडेसातशे कोटी

0
110

आवश्यक ते खाणविषयक सोपस्कार पूर्ण केलेल्या ८८ खाणींच्या लीजधारकांना मुद्रांक शुल्क भरण्यासाठी खाण खात्याने पाठविलेल्या नोटिसीनुसार आतापर्यंत ६० पेक्षा अधिक कंपन्यांनी सरकारच्या तिजोरीत मुद्रांक शुल्क जमा केली आहे. आतापर्यंत सुमारे ७४४ कोटी रुपये जमा झाले आहेत. १० फेब्रुवारी दरम्यान १२०० कोटी रुपये जमा होऊ शकेल, अशी माहिती खाण खात्यातील सूत्रांनी दिली.सरकारने खाण व्यवसाय बंदीचा आदेशही मागे घेतला आहे. पर्यावरण दाखल्यांवरील निलंबन मागे घेण्यासाठी आपले सरकार केंद्राला पत्र पाठविणार असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी यापूर्वीच सांगितले आहे. वरील स्थगिती मागे घेतल्यानंतर राज्यातील खाण व्यवसाय सुरू होण्याचा मार्ग खर्‍या अर्थाने मोकळा होईल.