खाणींच्या पर्यावरण दाखल्यांचे निलंबन हटविण्याचे आश्‍वासन

0
87

 केंद्राकडे प्रयत्न केल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
गोव्यातील खाणींच्या पर्यावरण दाखल्यांवरील निलंबन लवकरच मागे घेण्याचे आश्‍वासन केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. बंद असलेला खाण व्यवसाय चालू हंगामात पूर्ववत सुरू व्हावा यासाठी आपण प्रयत्न केल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.जावडेकर यांना काही विषयांवर स्पष्टीकरण हवे होते. ते त्यांना सादर केले आहेत. त्यामुळे आठवडाअखेर पर्यावरण दाखल्यांवरील निलंबनाचे आदेश मागे घेतले जातील, अशी अपेक्षा पार्सेकर यांनी व्यक्त केली.
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन वन आणि पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी गोव्यातील खाणींचे पर्यावरण दाखले निलंबित केले होते. सर्वोच्च न्यायालयाने खाण व्यवसाय सुरू करण्यास मान्यता देऊन बरेच दिवस उलटले आहेत. पर्यावरण दाखले नसल्याने व अन्य सोपस्कार पूर्ण न झाल्याने खाण व्यवसाय अद्याप सुरू झालेला नाही. पूर्वीप्रमाणे तो सुरू होईल की नाही याबाबतीतही संभ्रम आहे.
अनेक जणांनी पर्यायी व्यवसायही सुरू केले आहेत. वेगवेगळ्या भागातून येऊन गोव्यात स्थायिक झालेले ट्रक ड्रायव्हरही यापूर्वीच आपल्या गावी परतले आहेत.