खाणप्रश्‍नी सुनावणी पुन्हा लांबणीवर

0
200

सर्वोच्च न्यायालयात गोव्यातील खाणप्रश्‍नी याचिकेवरील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून खाण प्रश्‍नी याचिकेवरील सुनावणी याच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात काही खाण कंपन्यांनी गोव्यातील खाण बंदी उठविण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ८८ खाण लिजांचे नूतनीकरण रद्द करून खाण बंदी लागू केली आहे.