सर्वोच्च न्यायालयातील खाणप्रश्नी याचिकेवर येत्या २६ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्यातील खाण प्रश्नी याचिका मंगळवारी सुनावणीला आली होती. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी तहकूब करून पुढील आठवड्यात सुनावणी ठेवली आहे.
राज्यातील दोन खाण कंपन्यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत गोवा फाउंडेशनने हस्तक्षेप याचिका दाखल केलेली आहे. गोव्यातील खाण व्यवसायाचे भवितव्य या याचिकेवर अवलंबून असल्याने खाणप्रश्नी याचिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
राज्यातील खाण व्याप्त भागातील काही पंचायातींनी खाणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने खाणप्रश्नी निवाडा देण्यापूर्वी खाण बंदी प्रश्नी पंचायतींची बाजू एैकून घ्यावी, खाणप्रश्नी सुनावणी लवकर घेण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.