>> सर्व आमदारांना मुख्यमंत्र्यांची सूचना
सर्व आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील खराब झालेले रस्ते व विकासकामे यासंबंधीची माहिती त्यांच्या संबंधित कार्यकारी अभियंत्यांकडून मिळवावी व ती आपणाकडे सुपूर्द करावी, असे आपण आमदारांना कळवले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले.
आमदारांकडून विकासकामांसंबंधीचा अहवाल आपणाला मिळावा. त्यानुसार आपणाला आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकार्यांना देणे शक्य होणार असल्याचे आपण त्यांना कळवले असल्याचे ते म्हणाले.
विकासकामांच्याबाबतीत सर्वांत प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे ते रस्ते, वीज व पाणी यांना असे सावंत यानी स्पष्ट केले. सर्व भाजप आमदारांची बैठक घेतल्यानंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते.
खराब झालेले व खड्डेमय रस्ते दुरुस्त करणे, रस्त्यांवरील खराब झालेले पथदीप बसवणे, पाणी पुरवठ्यात सुधारणा घडवून आणणे ही कामे पावसाळा लांबल्यामुळे हाती घेता आली नव्हती.