खड्‌ड्यांची समस्या सुटल्याशिवा ‘अटल सेतू’ ताब्यात घेणार नाही

0
30

>> साबांखामंत्री नीलेश काब्राल यांची भूमिका

मांडवी नदीवरील तिसरा पूल अर्थात ‘अटल सेतू’वरील खड्‌ड्यांच्या समस्येचे निवारण झाल्याशिवाय सार्वजनिक बांधकाम खाते अटल सेतू ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी घेतली आहे. काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी अटल सेतूवरील खड्‌ड्यांबाबत भाष्य केले.

अटल सेतू हा नवीन पूल खड्‌ड्यांमुळे चर्चेत आहे. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाकडून अटल सेतूचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याच्या व्यवस्थापनाचे काम याच महामंडळाकडून केले जात आहे.

खड्‌ड्यांचा अभ्यास आयआयटी मद्रासकडून केला जात आहे. आपण खड्‌ड्यांच्या दुरुस्तीच्या कामाचा पाठपुरावा करीत आहे. बांधकाम खाते पूल योग्य असल्याची खात्री करूनच पुलाचा ताबा घेणार आहे, असे काब्राल यांनी सांगितले. बोरी पुलावरील खड्‌ड्यांच्या दुरुस्तीसाठी हा पूल १० ते १५ तास बंद ठेवावा लागणार आहे. झुआरी पूल अवजड वाहनांसाठी बंद असल्याने बोरी पुलावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. नव्या झुआरी पुलाचा एक भाग वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर बोरी पूल बंद ठेवून खड्‌ड्यांची दुरुस्ती केली जाणार आहे, असेही मंत्री काब्राल यांनी सांगितले.