राज्यात २४ तासांत नव्या
८२ कोरोना रुग्णांची नोंद

0
11

राज्यात मागील चोवीस तासांत नवीन ८२ कोरोनाबाधित आढळून आले असून, सक्रिय रुग्णसंख्या साडेपाचशेच्या वर गेली आहे. सध्या राज्यात ५६९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ७.७७ टक्के एवढे आहे.
राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या महिन्यात एका कोरोना बळीची नोंद झाली आहे. तसेच एका दिवसांत शंभरपेक्षा जास्त रुग्ण देखील आढळून आले आहेत.

राज्यात चोवीस तासांत नवीन १०५४ स्वॅबचे नमुने तपासण्यात आले आहेत, त्यातील ८२ नमुने बाधित आढळून आले. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३८३३ एवढी आहे. चोवीस तासांत एकाही बाधिताला इस्पितळात दाखल करावे लागलेले नाही.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. मागील चोवीस तासांत आणखी ६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२२ टक्के एवढे आहे. राज्यात गेल्या पंधरा दिवसांत १२ हजार ५८९ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यात नवीन ८८७ कोरोनाबाधित आढळून आले.