क्विंटन डी कॉकला दुखापत

0
73

दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज दुखापतीच्या कारणास्तव भारताविरुद्ध उर्वरित एकदिवसीय सामन्यांना तसेच त्यानंतरच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहे. सेंच्युरियनमध्ये झालेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यादरम्यान डी कॉकच्या डाव्या मनगटाला दुखापत झाली होती. या दुखापतीचे स्वरुप गंभीर नसले तरी त्याला २ ते ४ आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. डी कॉकच्या अनुपस्थितीत हेन्रिक क्लासेन याला तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात पदार्पणाची संधी मिळणार आहे. डीव्हिलियर्स, ड्युप्लेसी व स्टेन यांच्या दुखापतींमुळे दुबळा बनलेल्या द. आफ्रिकेला डी कॉकच्या दुखापतीमुळे जबर धक्का बसला आहे.