क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन

0
0

लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. संझगिरी यांनी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पेशाने सिव्हिल इंजिनीयर असलेले द्वारकानाथ संझगिरी मुंबई महापालिकेत उच्च पदावर काम करत होते. मात्र क्रिकेटवर लिहिणे, बोलणे आणि मराठी साहित्यातली त्यांची रुची त्यामुळे त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडला. मराठी क्रिकेट रसिकांनी त्यांच्या क्रिकेटवरच्या लेखांना आणि इतर लेखांना कायमच दाद दिली होती. क्रिकेट या खेळाबाबतची माहिती देणारा, त्यातली सौंदर्यस्थळे लेखणीने टिपणारा एक अवलिया माणूस काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
द्वारकानाथ संझगिरी यांनी 1983 पासून ते आजपर्यंतचे सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कप देखील कव्हर केले आहेत. स्तंभलेखना व्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर 40 पुस्तके लिहिली आहेत.