कोव्हॅक्सीन, कोविशील्ड लशींना ११० देशांनी दिली मान्यता

0
21

भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली कोविशील्ड ह्या कोरोना प्रतिबंधक लशींना जगभरातील ११० देशांनी मान्यता दिली आहे.

दरम्यान, केंद्र सरकार जगातील उर्वरीत देशांशी या लशीच्या मान्यतेबाबत सर्ंपकात आहे, सर्वात मोठ्या कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमामुळे लाभार्थींना मान्यता मिळाल्यास त्यांचा शिक्षण, व्यवसाय आणि पर्यटन हेतूंसाठीचा प्रवास सुलभ होईल.

केंद्र सरकारने लवकरच कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनला उर्वरित देशातही मान्यता मिळू शकेल असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, भारताने आतापर्यंत कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनचे सर्वाधिक डोस दिले आहेत, त्यामुळे या लशींचे डोस घेतलेल्या लोकांना या लशींना मान्यता नसलेल्या देशांमध्ये प्रवास करणे शक्य होत नाही. कारण, कोरोनाची परिस्थिती पाहता बहुतेक देशांनी परदेशी प्रवाशांना त्यांची लस घेतलेल्याची माहिती देणे बंधनकारक केले आहे.