‘कोव्हॅक्सिन’च्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीचा पुढील आठवड्यात अहवाल

0
114

भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीचा निकाल पुढील सात ते आठ दिवसात येण्याची शक्यता आहे, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारतीय कोरोना लस कोव्हॅक्सिनला अमेरिकेने त्यांच्या देशात परवानगी नाकारली आहे. अमेरिकेच्या या निर्णयाच्या काही तासांनंतर लगेचच मोदी सरकारने कोव्हॅक्सिन लशीबाबत ही मोठी माहिती दिली आहे. कोव्हॅक्सिन लशीच्या चाचणीबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक महत्त्वाची माहिती देताना तिसर्‍या चाचणीचा निकाल येत्या आठवड्यात येणार असल्याचे सांगितले. हैदराबादमधील भारत बायोटेक या कंपनीकडून उत्पादित केल्या जाणार्‍या या कोव्हॅक्सिन लशीला भारतात आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे.