कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशींचे उत्पादन वाढवणार

0
48

कोरोनावरील कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशींचे उत्पादन वाढवण्यात येणार असल्याची माहिती काल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली.

कोविशिल्ड लशीचे महिन्याचे उत्पादन ११ कोटीवरून वाढवून १२ कोटींवर आणि कोवॅक्सिनची उत्पादन क्षमता २.५ कोटी डोसवरून वाढवून ५.८ कोटी वाढण्याची अपेक्षा आहे असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी एका लेखी उत्तरात राज्यसभेत सांगितले. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटद्वारे कोविशिल्डचे तर कोव्हॅक्सिनचे उत्पादन हे हैदराबादमधील भारत बायोटेकद्वारे केले जाते.

कोविशिल्डच्या उत्पादनाची क्षमता ही महिन्याला ११ कोटी डोसवरून १२ कोटी तर कोव्हॅॅक्सिनची उत्पादन क्षमता २.५ कोटी डोसवरून महिन्याला ५.८ कोटी इतकी होण्याची अपेक्षा असल्याची माहिती त्यांनी दिली.