कोविड लस काही दिवसांतच ः डॉ. हर्षवर्धन

0
234

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल, काही दिवसांतच देशवासीयांना कोविड-१९ ची लस मिळू शकेल, असे सांगितले. चेन्नईच्या सरकारी रुग्णालयात लशीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात देशव्यापी ड्राय-रनची समीक्षा करण्यासाठी गेले असता आरोग्यमंत्री बोलत होते. लशीकरण मोहिमेचा प्रत्येक तपशील राष्ट्रीय स्तरापासून समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत पोहचवता येईल, याबद्दल सरकारकडून तयारी करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रन्टलाईन वर्कर्सना लस दिली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी पुन्हा सांगितले.
भारताने फार कमी वेळात लस विकसित केली असून सर्वात अगोदर आपल्या आरोग्य कर्मचार्‍यांना ही लस देण्यात येईल. यासाठी रंगीत तालिमीच्या (ड्राय रन) माध्यमातून आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ड्राय रन यशस्वी
दरम्यान, काल शुक्रवारी देशातील ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील एकूण ७३६ जिल्ह्यांत ड्राय रन आयोजित करण्यात आले होते. काल झालेले ड्राय रन यशस्वी झाल्याचे आरोग्यंत्र्यांनी यावेळी सांगितले.