गोव्यात कोविडचा नवा उत्सर्जित विषाणू सापडला नसल्याचे साथींच्या रोगांचे तज्ज्ञ डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी काल स्पष्ट केले. राज्यात सापडलेल्या कोविड रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येत आहेत.
या घडीला राज्यात दररोज सुमारे ५०० ते ६०० जणांचे नमुने तपासले जात आहेत; मात्र केवळ एक किंवा दोन कोविड रुग्ण सापडत असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सध्या राज्यातील कोविड स्थिती खूपच चांगली आहे, असेही ते म्हणाले.