वाघुर्मेत के्रन पाण्यात पडल्याने चालक ठार

0
11

के्रन पाण्यात पडल्याने झालेल्या अपघातात क्रेनचालक नदीत बुडून ठार होण्याची घटना घडली. वाघुर्मे येथील सुदर्शन ड्रायडॉक येथे ही घटना घडली. ठार झालेल्या क्रेनचालकाचे नाव राजेंद्र कुमार मांझी (३२) असे आहे. तो मूळ बिहार येथील आहे. वाघुर्मे येथे म्हादई नदीत सुदर्शन ड्रायडॉकचे काम चालू असून, तेथे हा अपघात घडला.