कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ः डॉ. मोन्तेरो

0
17

राज्यात मागील डिसेंबर २०२२ या महिन्यात नवीन कोरोना बाधिताची कमी झाली आहे. तथापि, विदेशात चीन, जपान व इतर देशात कोरोना महामारीचा पुन्हा फैलाव होत असल्यामुळे आपण सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे असे मत भारतीय वैद्यकीय संघटनेच्या गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. रूफीन मोन्तेरो यांनी व्यक्त केले आहे.

देश आणि राज्यात कोविड लसीकरणामुळे परिस्थिती नियंत्रणाखाली आली आहे. तरीही आत्तापासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. भारतीय वैद्यकीय संघटनेकडून कोविड महामारीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य सल्ला दिला जात आहे. विदेशातील चीन, जपान, दक्षिण कोरिया, थायलंड व इतर देशात कोरोना महामारी पुन्हा मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. चीनमध्ये कोरोना महामारीमुळे नागरिकांचे बळी जात आहेत, असेही डॉ. मोन्तेरो यांनी सांगितले. केंद्र सरकारने विदेशात वाढणार्‍या कोरोना महामारीमुळे राज्यांना सतर्कतेचा आदेश दिला आहे.

डिसेंबरमध्ये ५४ बाधित
राज्यात मागील डिसेंबर महिन्यात नवीन ५४ बाधित आढळून आले होते. या महिन्यात एकाही कोरोना बळीची नोंद झाली नाही. तसेच कोरोनाबाधितांना इस्पितळातसुद्धा दाखल करावे लागले नाही. या महिन्यात सुमारे १४ हजार ३११ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.