कोरोनामुळे राज्यात २ मृत्यू, १२० बाधित

0
42

राज्यात कोरोनामुळे गेल्या चोवीस तासांत दोघांचा मृत्यू झाला असून १२० बाधित सापडले आहेत. तसेच गेल्या चोवीस तासांत ११४ जण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ९०६ एवढी झाली आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता ३१८२ एवढी आहे. काल राज्यात ४३९८ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,७२,९६६ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर इस्पितळांतून काल ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

चोवीस तासांत ११४ कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. राज्यात काल गुरूवारी ११४ जण बरे झाले आहेत. सध्या राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,६८,८७८ एवढी झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. तसेच काल नव्याने इस्पितळात १७ जणांना भरती करण्यात आले.

काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने १०३ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला.सध्या राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मडगाव येथे असून त्यांची संख्या ६९ आहे. कासावली ५८, पणजी ६२ अशी रुग्णसंख्या असून इतर ठिकाणी ५० पेक्षा कमी रुग्ण आहेत.
आतापर्यंत इस्पितळात उपचार घेतलेल्यांची संख्या २८,९०६ एवढी असून गृहविलिनीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२०,५८३ एवढी आहे. राज्यात आतापर्यंत ११,५४,४६७ एवढ्या लोकांची चाचणी करण्यात आलेली आहे.