राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन १६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, एका कोरोना रुग्णाच्या बळीची नोंद झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २३५ एवढी झाली आहे तर कोरोना बळींची एकूण संख्या ३३७८ एवढी आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी २६ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९८ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत २१३८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील १६ नमुने बाधित आढळून आले. कोरोनामुक्त झाल्यामुळे इस्पितळातून काल २ जणांना घरी पाठविण्यात आले. तसेच कोरोनाची लक्षणे जाणवल्याने ३ रुग्णांना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले.