राज्यात कोरोनाचे नवे ७३ रुग्ण आढळले असून ३ रुग्णांचा बळी गेला. सध्याच्या रुग्णांची संख्या १३०७ एवढी आहे. कोरोना बळींची संख्या ३१२६ एवढी असून काल १३९ रुग्ण बरे झाले आहेत. बर्या झालेल्या रुग्णांची संख्या १,६५,८३९ एवढी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४० टक्के आहे. चोवीस तासांत ३०३१ स्वॅबच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. १३ रुग्णांना इस्पितळांतून डिस्चार्ज देण्यात आला. १२ रुग्णांना इस्पितळांत दाखल केले.