कोरोनाने राज्यात दोघा जणांचा मृत्यू

0
44

>> नव्या ८६ कोरोनाबाधितांची नोंद

कोविडमुळे काल राज्यात आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३३२२ एवढी झाली आहे. काल मृत्यू झालेल्यांमध्ये सांताकू्रझ येथील एका ५६ वर्षीय महिलेचा व कुंभारजुवे येथील एका ८० वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.दरम्यान, गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेले नवे ८६ रुग्ण आढळले.

काल राज्यभरात ४२५६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यापैकी ८६ जणांना संसर्ग झाला असल्याचे आढळून आले. गेल्या २४ तासांत रोगमुक्त झालेल्यांची संख्या ही ६६ एवढी आहे. त्यामुळे या घडीला राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही ७४७ एवढी झाली आहे.
कोविड संक्रमाणाचा दर हा २.०२ टक्के एवढा आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.७० टक्के एवढे आहे.

राज्यात या घडीला सर्वाधिक ८० रुग्ण हे मडगाव येथे असून, त्यापाठोपाठ ५१ रुग्ण हे फोंडा येथे आहेत. पणजी येथे ४८ एवढे रुग्ण आहेत. कांदोळी येथे ४५, तर काणकोण येथे ३८ रुग्ण आहेत.