कोरोनाचा संसर्ग झालेले नवे २३ रुग्ण गेल्या चोवीस तासांत राज्यात सापडले. तसेच गेल्या चोवीस तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३३७५ एवढी झाली आहे. गेल्या २४ तासांत २६९९ जणांची कोरोनासाठी चाचणी केली असता त्यापैकी २३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे आढळून आले. कोरोनाचा संसर्ग होण्याची टक्केवारी ०.८५ टक्के एवढी आहे. गेल्या २४ तासांत २० जण कोविडमुक्त झाल्याने या घडीला राज्यात सक्रीय कोविड रुग्णांचे प्रमाण हे २५२ एवढे आहे.