>> शुक्रवारी ६ मृत्यू, ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत १०३ बळी
राज्यात चोवीस तासांत नवे ३२१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह आणखी ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ऑक्टोबर महिन्याच्या १६ दिवसात १०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या ५३१ एवढी झाली आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्येने ४० हजारांचा टप्पा पार केला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ०९१ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ३९५० एवढी झाली आहे.
६ जणांचा मृत्यू
राज्यातील आणखी ६ कोरोना रुग्णांचे निधन झाले आहे. गोमेकॉमध्ये पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, उत्तर गोव्यातील एका खासगी इस्पितळात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
कळंगुट येथे ७१ वर्षांचा पुरुष, बोरी फोंडा येथील ६० वर्षांचा पुरुष, दवर्ली सासष्टी येथील ७३ वर्षांची महिला, काणकोण येथील ६५ वर्षांची महिला, वेळगे डिचोली येथील ७२ वर्षांचा पुरुष आणि पेडे म्हापसा येथील ५७ वर्षांच्या महिला रुग्णाचे निधन झाले आहे.
बार्देशमध्ये सर्वाधिक २३ बळी
ऑक्टोबर महिन्यात बार्देश तालुक्यात आत्तापर्यंत सवार्ंधिक २३ बळींची नोंद झाली आहे. तिसवाडीत १७ बळी, सासष्टीत १६ बळी, फोंड्यात १५ बळी, केपे ८ बळी, मुरगाव ७ बळी, डिचोली, सांगे आणि काणकोण येथे प्रत्येकी ४ बळी, पेडणे ३ बळी, सत्तरी १ बळी आणि एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
४४९ रुग्ण कोरोनामुक्त
कोरोना पॉझिटिव्ह आणखी ४४९ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ६१० एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.८२ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन २२२ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळामध्ये नवीन ४७ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.
पणजीत नवे १५ रुग्ण
पणजीत नवे १५ कोरोना रुग्ण काल आढळून आले असून कोरोना रुग्णांची एकूण संख्या २१६ एवढी झाली आहे. कोविड केअर सेंटरमधील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त खाटा रिकाम्या आहेत. उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमधील ४६९ खाटांपैकी २४१ खाटा रिक्त आहेत. तर, दक्षिण गोव्यातील १००६ खाटांपैकी ७३६ खाटा रिक्त आहेत.
पर्वरीत सर्वाधिक रुग्ण
उत्तर गोव्यात पर्वरी येथे सर्वाधिक २९७ रुग्ण आहेत. चिंबल येथे २५३ रुग्ण, पणजी येथे २१६ रुग्ण, म्हापसा येथे २१३ रुग्ण, साखळी येथे २०२ रुग्ण, पेडणे येथे ११० रुग्ण, वाळपई ११६ रुग्ण, कांदोळी १६८ रुग्ण, खोर्ली ११२ रुग्ण. शिवोली ११९ रुग्ण आहेत. दक्षिण गोव्यात मडगाव येेथे सर्वाधिक २९६ रुग्ण आहेत. वास्को येथे २१६ रुग्ण, फोंडा २३३ रुग्ण, कुठ्ठाळी १७२ रुग्ण, कुडचडे १०२ रुग्ण आहेत.