कोरगावात पेडणे पोलिसांकडून २० लाखांचे अमली पदार्थ जप्त

0
254

माईण-कोरगाव येथे पेडणे पोलिसांनी एका घरावर छापा टाकून २० लाख रुपयांचे अमली प्रदार्थ जप्त केले. या प्रकरणी लार्सन रिचर्ड (३४, बांद्रा मुंबई) व रेनेनील संतान डिसोझा (४४, कोरगाव) यांना अटक करत त्यांच्यावर गुन्हा नोंद केला.

पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, माईण कोरगाव येथे एका घरात अमली प्रदार्थ व्यवसाय तसेच गांजा लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवार दि. २३ रोजी रात्री उशिरा त्या घरावर श्री. दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने छापा टाकला. यावेळी यावेळी गांजा ८६०० रु., चरस एकूण पाच लाख ६० हजार व केनाबीस झाडे १४ लाख असे १९ लाख ६८,६०० रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले.