आम. कुंकळकरांची ग्वाही
आपण सरकारचा घटक असल्याने कोकणी भवनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन पणजीचे आमदार सिध्दार्थ कुंकळकर यांनी काल दिले. गोवा कोकणी अकादमीने येथील कला आणि संस्कृती खात्याच्या सभागृहात आयोजित केलेल्या अकादमीच्या २९ व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कोकणी भाषा दैनंदिन व्यवहाराच्या कामात अधिकाधिक वापरण्याची गरज कुंकळकर यांनी व्यक्त केली. रवींद्र केळेकर, चंद्रकांत केणी, पुरुषोत्तम मल्ल्या, ऍड्. उदय भेंब्रे यांच्या सारख्या कोंकणीच्या नेत्यांनी मुत्सद्दीपणे प्रयत्न केले. त्यामुळेच कोकणी राष्ट्रीय स्थरावर पोचल्याचे कोकणी अकादमीचे अध्यक्ष पुंडलीक नाईक यांनी सांगितले. साहित्य अकादमीचे कोकणीचे निमंत्रक डॉ. तानाजी हळर्णकर यांच्या हस्ते अकादमीच्या पहिल्या ङ्गअनन्यफ या पत्रिकेचे प्रकाशन झाले. उपाध्यक्ष भूषण भावे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रिका पाडगांवकर यांनी तर कुमुद नाईक यांनी आभार मानले. या कार्यक्रमात माणिकराव गावणेकर व नरेंद्र कामत यांच्याही पुस्तकांचे प्रकाशन झाले.