कॉंग्रेस-गोवा फॉरवर्डमध्ये आज युतीसंबंधी बैठक

0
13

कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड या पक्षांमध्ये युतीसंबंधी दुसर्‍या टप्प्यातील बोलणी आज होणार आहे. ह्या चर्चेसाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची आज पाटो पणजी येथे बैठक होणार आहे. दोन्ही पक्षांनी यापूर्वीच विधानसभा निवडणुकीसाठी युती झाल्याचे म्हटले असले तरी अजून युतीवर शिक्कामोर्तब झालेले नाही.

कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव व आमदार दिगंबर कामत आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई व विनोद पालयेकर यांनी नवी दिल्ली येथे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर दोन्ही पक्षांत युती झाल्याचे स्पष्ट केले होते. मात्र नंतर कॉंग्रेसने युतीसंबंधी बोलणे टाळले होते. या पार्श्‍वभूमीवर आज दोन्ही पक्षांत युतीसंबंधी बोलणी होत आहे.