नॅशनल हेराल्ड कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काल कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून दोन तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली. या कालावधीत ईडीकडून सोनिया गांधी यांना जवळपास २४ प्रश्न विचारण्यात आले. यासोबतच सोनिया गांधी यांनी प्रश्नांची उत्तरे संगणकावर रेकॉर्ड करण्यासाठी सहाय्यकाची मागणी केली.दुसर्या बाजूला सोनिया गांधींची ईडी चौकशी म्हणजे राजकीय सुडाची कारवाई आहे, असा आरोप कॉंग्रेसने केला. तसेच याविरोधात देशभरात आंदोलने करण्यात आली.