कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी आता तिरंगी लढत

0
12

कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसात नाट्यमय घडामोडी घडल्या. काल सकाळपर्यंत अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे दिग्विजय सिंह यांनी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे या शर्यतीत दाखल झाले. शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. सोबतच झारखंडमधील के. एन. त्रिपाठी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.