कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी बैठकीत २३ जूनला निवडणूक होईल, असे जाहीर करण्यात आले होते. तसेच अर्ज भरण्याची शेवटची तारीख ७ जून असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र करोनाचे कारण देत पुन्हा एकदा निवडणूक टाळण्यात आली आहे. तारीख जाहीर झाल्याच्या अवघ्या काही तासातच निर्णय बदलण्यात आला आहे. अध्यक्षपदाची निवडणूक तिसर्यांदा टाळण्यात आली आहे. त्यामुळे पुढची तारीख जाहीर होईपर्यंत सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद राहणार आहे. पाच राज्यातील निवडणुकांमध्ये पक्षाच्या कामगिरीवर कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.