>> फेरआढावा बैठक निर्णयाविना
प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अद्यापही कॉंग्रेस पक्षश्रेष्ठांना गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यास यश आलेले नाही. मात्र, प्रदेश अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री असलेल्या तीन दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन व नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांचा समावेश आहे.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व गिरीश चोडणकर यांच्या नुकत्याच दिल्ली भेटीत गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव व पक्षाचे सरचिटणीस (संघटन) वेणू गोपाळ यांनी चर्चा झाली नाही.
मी स्पर्धेत ः सार्दिन
खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना काल आमच्या प्रतिनिधीने विचारले असता आपण प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे मान्य केले. दिगंबर कामत यांनी सध्या तरी प्रदेशाध्यक्षपदाबाबत स्पष्ट बोलण टाळले आहे. तर लुईझिन फालेरो यांनी आपणाला इच्छा नसल्याचे काल दै. नवप्रभाशी बोलताना स्पष्ट केले.