कैदी मारहाणप्रकरणी दोन महिन्यांत चौकशीचे आदेश

0
4

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी मारहाण, सतावणुकीसंबंधी केलेल्या आरोपाची उत्तर गोवा प्रधान न्यायाधीशांनी 2 महिन्यात चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील काही कैद्यांनी मुंबई उच्च न्यायालयात तुरुंग प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या सतावणुकीबाबत याचिका दाखल केली आहे. मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणानंतर काही कैद्यांना वेगवेगळे ठेवण्यात आले होते. यात काही कैद्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.