केरी – सत्त्तरी येथे दोन माड बाजार परिसरात काल बुधवारी संध्याकाळी टँकरने (केए २५ एए ९९२४) सुब्रह्मण्यम मुत्तू गवंडर (५०) या पादचार्याला ठोकरल्याने त्याचा मृत्यू झाला. काल संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. येथील बाजार परिसरातील मुख्य रस्त्याने बेळगावच्या दिशेने हा टँकर जात होता.
टँकरने सुब्रह्मण्यम याला समोरून धक्का दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला साखळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोमेकॉत नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. वाळपई पोलिसांनी पंचनामा करून टँकरचालकावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. सुब्रह्मण्यम हा केरीतील अंजुणे धरण भागातील तामीळ वस्तीतील आहे.