केरीत साडेतीन मीटर लांबीचा अजगर!

0
136

मोर्ले (न. वा.)
केरी-सत्तरी येथील व्यंकटराव ऊर्फ बबन राणे यांच्या घराच्या छतावर असलेला सुमारे साडेतीन मीटर लांबीचा अजगर काल रविवारी सर्पमित्र विराज(वीरू) नाईक व अमेय (बिट्टू) नाईक यांनी पकडला व त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात आले. बबन राणे यांनी सर्पमित्र विराज नाईक याला फोन केल्यानंतर लागलीच विराज व अमेय त्याठिकाणी पोचून त्यांनी अजगराला पकडले.
विराज नाईक यांनी यापूर्वी किंग कोब्रा पकडले असून विर्डी दोडामार्ग येथे १६ फूट लांबीचा किंग कोब्रा पकडला आहे. त्याचप्रमाणे त्याने अनेक कोब्रा व अन्य विषारी, निमविषारी व बिनविषारी साप पकडले आहेत. तसेच अनेक प्राण्यांना जीवदान दिले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.