केप्यात गाडी अडवून पावणेचार लाखांना लुटले

0
81

बोरीमळ केपे येथे मालपुरवठा करणारी मालवाहू गाडी अडवून सेल्समनकडील ३.८४ लाख रुपयांची रक्कम लुटल्याप्रकरणी केपे पोलिस स्टेशनवर आगुस्तीन सुप्रियानो कार्वाल्यो याच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

बुधवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता ही रस्ता लुटीची घटना घडली. तक्रार काल सायंकाळी गुरुप्रसाद करमळकर यांनी नोंदविली. गजानन एजंसीचे कर्मचारी या मालवाहू गाडीने दुकानदारांना मालाचा पुरवठा करून रक्कम घेऊन जातात. काल आगुस्तीन कार्वाल्यो याने आपली गाडी रस्त्यावर आडवी घालून, मालवाहू गाडीतील सेल्समनकडील रक्कम हिसकावून घेतली व तो पसार झाला. या आधीही आगुस्तीन याने रस्त्यावर आणखी एकट्याला ४० हजार रुपयांना तर मडगांव येथे १.४० लाख रुपयांना लुटले होते. पोलिसाना संशयिताचे नाव देऊनही पोलिस पकडण्यात वेळकाढू धोरण स्वीकारतात म्हणून ऑल गोवा एफएमसीजी या व्यापारी संघटनेने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यापर्यंत ही तक्रार पोहचविण्याची तयारी चालविली आहे.