मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आदर्श आचारसंहितेच्या कथित उल्लंघनप्रकरणी दिलासा दिला.
उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने आदर्श आचारसंहितेच्या (एमसीसी) उल्लंघन प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना 19 सप्टेंबर 2022 रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी बजावलेले समन्स रद्द केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हापसा येथील न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. म्हापसा येथे निवडणुकीच्या काळात केजरीवाल यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाची आता दंडाधिकाऱ्यांसमोर 12 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 123 (1) आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 171 बी आणि 171 ईचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केजरीवाल यांना 29 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यांनी हजर राहण्यापासून सवलत मागितली होती.