केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक : तानावडे

0
7

केंद्रातील भाजप सरकारने सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प मांडला असून, या अर्थसंकल्पातून समाजातील सर्व घटकांना न्याय दिला आहे, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल येथील पत्रकार परिषदेत केला.

देशाचा विकास दर ९.२७ टक्के एवढा राहील, अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. सरकारने आगामी पाच वर्षांत साठ लाख नव्या रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. आत्मनिर्भर भारत संकल्पनेस चालना देण्यासाठी संरक्षण खात्याच्या एकूण खर्चापैकी सुमारे ६८ टक्के रक्कम देशांतर्गत उद्योगांना देऊन संरक्षण साहित्याची निर्मिती देशातच करण्यात येणार आहे, असे तानावडे म्हणाले. पंतप्रधान आवास योजनेखाली देशात सुमारे ८० लाख घरे बांधण्यात येतील, त्यासाठी तब्बल ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

गोव्यातील शेतकर्‍यांना कृषी क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींचा व पर्यटन क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींचा व्यावसायिकांना लाभ घेता येईल, असेही तानावडे यांनी स्पष्ट केले.