केंद्र सरकारकडून गोव्याला ४५० कोटींचा निधी प्राप्त

0
21

केंद्रीय करांतील गोव्याचा वाटा म्हणून केंद्र सरकारने गोव्याला ४५०.३२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. गोव्याला हा निधी भांडवली गुंतवणूक व विकासकामांसाठी खर्च करण्यासाठी केंद्र सरकारने हस्तांतरित केला आहे.

केंद्र सरकारने केंद्रीय करांतील राज्यांचा वाटा म्हणून सर्व राज्यांना दोन हप्त्यांत निधी दिलेला असून, पहिला हप्ता हा १,१६,६६५.७५ कोटी रुपयांचा आहे. हा निधी १० ऑगस्ट रोजी दिला आहे. त्याशिवाय नियमित मासिक कर हस्तांतरणाचा वेगळा ५८,३३२.८६ कोटी रुपये एवढ्या निधीचा वेगळा आणखी एक हप्ता राज्यांना दिला आहे. या कर हस्तांतरणाच्या दोन हप्त्यांपेटी गोव्याला ४५०.३२ कोेटी रुपये केंद्राने अदा केले आहेत. राज्यांच्या भांडवली व विकास खर्चाला गती देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने राज्यांना ही कर हस्तांतरणाची रक्कम वितरित केली आहे.