केंद्रीय पर्यटन खात्याकडून काश्मीरला १०० कोटी

0
86

नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाणार्‍या जम्मू काश्मीरला मदतीचा ओघ सुरू झाला आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने १०० कोटींची विशेष मदत निधीची घोषणा केली आहे. केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांनी हा निधी जम्मू काश्मीरमधल्या शासकीय पर्यटन सुविधेसाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले. याशिवाय नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून राज्य सरकारला आणखी काही निधी हवा असल्यास तसा प्रस्ताव पाठविण्याचे आवाहनही केले आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणखी निधी मंजूर करणार आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पर्यटनासाठीच्या पायाभूत सुविधा विकासाकडे लक्ष पुरविणार असल्याचे ठरविले आहे.