संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघाचा राजीनामा दिल्याची माहिती विधीमंडळ खात्याने आपल्याला कळविल्यानंतर आपण पणजी मतदारसंघ रिक्त झाल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाला कळविले आहे. आयोगाकडून योग्य तो आदेश आल्यानंतरच पणजी मतदारसंघासाठी पोट निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे संयुक्त निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी सांगितले.