केंद्रीय गृहमंत्र्यांशी खाणप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांची दिल्लीत चर्चा

0
115

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल तातडीने नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांच्याशी राज्यातील बंद असलेला खाण प्रश्‍न, कोळसा प्रश्‍नाच्या विषयावर चर्चा केली. जिल्हा पंचायत निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल शहा यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. केंद्राकडून कोविड लशीकरणासाठी सर्वप्रकारचे सहकार्य देण्याचे आश्‍वासन गृहमंत्र्यांनी यावेळी डॉ. सावंत यांना दिले.
दरम्यान, शेळ मेळावली येथील नियोजित आयआयटी संकुलाच्या विरोधातील आंदोलनासंबंधी चर्चेबाबत काहीच माहिती मिळाली नाही.