‘कॅश फॉर क्वेश्चन’ प्रकरणी खासदार मोईत्रा यांचे निलंबन

0
17

‘कॅश फॉर क्वेश्चन’ प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे काल लोकसभेतून निलंबन करण्यात आले. पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात संसदेच्या नीतीमत्ता समितीने मोईत्रा यांचे निलंबन रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर काल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणावर लोकसभेत जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा करण्यात आली.
लोकसभेत काल तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याशी संबंधित असलेला कॅश फॉर क्वेश्चन प्रकरणावरील नीतिमत्ता समितीचा अहवाल काल लोकसभेत मांडला गेला. समितीच्या अहवालात मोईत्रा यांचे निलंबन करण्यात यावे, अशी शिफारस होती. मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या, असा आरोप ठेवण्यात आला होता.