कूळ-मुंडकार कायदा दुरुस्ती मागे घ्या

0
118

‘उटा’च्या दशकपूर्ती सभेत मागणी
कूळ – मुंडकार कायद्यात राज्य सरकारने केलेली दुरुस्ती त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी काल बेतोडा येथे झालेल्या ‘उटा’ संघटनेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित सभेत करण्यात आली. सोहळ्याला राज्यभरातून सुमारे १५ हजार लोकांची उपस्थिती होती.सोहळ्यास प्रमुख वक्ते म्हणून आमदार विष्णू वाघ उपस्थित होते. मागण्या मान्य करून घेण्यासाठी एकत्रित लढा देण्याची वेळी आल्याचे ते म्हणाले. समाजात फूट पाडण्याचे कारस्थान सुरू असल्याचे सांगून त्याचा मुकाबला करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.
व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, माजी अध्यक्ष यशवंत गावडे, विश्‍वास गावडे, मालू वेळीप, डॉ. सूर्या गावडे, ऍड. जॉन फर्नांडिस, माजी मंत्री मामा कार्दोज, गोविंद गावडे आदी जण उपस्थित होते.
गावडा-कुणबी-वेळीप जमातींसाठी १२ टक्के आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी करावी, ‘उटा’च्या मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या काही नेत्यांवर विविध न्यायालयांत खटले दाखल केले आहेत ते सरकारने मागे घ्यावे, या जमातींसाठीच्या सर्व सवलती द्याव्या असे ठराव, यावेळी संमत करण्यात आले.