कुळे-वास्को लोकल ट्रेनचा मुद्दा तानावडेंकडून संसदेत उपस्थित

0
20

राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी संसदेत शून्य प्रहराला कुळे ते वास्को दरम्यान लोकल ट्रेनचा मुद्दा काल उपस्थित केला. शालेय विद्यार्थी, कामगार वर्ग आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी कुळे ते वास्को या लोकल ट्रेनची सेवा तातडीने सुरळीत करावी, अशी मागणी तानावडे यांनी केली. खासदार तानावडे यांनी कुळे ते वास्को दरम्यानच्या दुहेरी ट्रॅकिंगच्या कामामुळे लोकल ट्रेन अनियमित असल्याने पर्यायी वाहतूक व्यवस्था नसल्याने नागरिक, विद्यार्थी, कामगारवर्ग यांची गैरसोय होत असल्याचे रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. वास्को ते कुळे दरम्यान रेल्वे मार्गाचे दुपरीकरणाच्या कामामुळे ही लोकल ट्रेन बंद ठेवली जात आहे. ग्रामस्थांनी याबाबत दक्षिण-पश्चिम रेल्वे प्रशासनाला निवेदन सादर केले आहे; मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही, असेही तानावडे यांनी संसदेत सांगितले.