एक झाड तोडण्यासाठी 5 हजार रुपये सुरक्षा ठेव

0
13

राज्यात सर्वसामान्य व्यक्ती वगळता इतर म्हणजेच संस्था, कंपन्या आदींना आता प्रत्येक झाड तोडण्यासाठी सुरक्षा ठेव म्हणून 5 हजार रुपये वन खात्याकडे भरावे लागणार आहेत. वन खात्याने झाडे कापण्यासाठी अर्ज करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्ती वगळता इतर सर्वांसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ केली आहे. आता, व्यक्ती वगळता इतरांना प्रति झाड 5 हजार रुपये सुरक्षा ठेव म्हणून भरावी लागणार आहे. वर्ष 2019 मध्ये सर्वसामान्य व्यक्तीसाठी प्रति झाड 1 हजार रुपये सुरक्षा ठेव निश्चित करण्यात आली आहे. त्यात कोणताही बदल केलेला नाही.