कुडचडेतील दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, दोघे जखमी

0
7

राज्यातील रस्ता अपघातांचे प्रमाण हे वाढतच चालले असून शनिवारी रात्री कुडचडे येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या एका अपघातात एकजण ठार तर अन्य दोघेजण जखमी होण्याची घटना घडली. शनिवारी रात्री कुडचडे रवींद्र भवनजवळ झालेल्या या अपघातात आमोणे येथील मनोज सुतार याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री 12च्या दरम्यान घडला. अन्य दोघेजण या अपघातात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मडगाव येथील जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. कुुडचडे येथे मलनिस्सारणासाठी कंत्राटदाराने रस्ते खोदल्यानंतर मातीचा भराव घालून खोदलेल्या रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती केली नाही. यातील एका खड्ड्यामुळे वरील अपघात शनिवारी झाला.