कुडका शिवमंदिरात नासधूस

0
92

गुरुवारी रात्री कुडका येथील शिव मंदिरात अज्ञातांनी नासधूस व चोरी केल्याने काल तेथील वातावरण तंग होण्याची स्थिती निर्माण झाली. परंतु आगशी पोलिसांनी वेळीच तेथे धाव घेऊन चौकशी सुरू केल्याने वातावरण शांत झाले. चोरट्यांना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. देवळातील घंटा व अन्य काही वस्तू पळविण्यात आल्याचे आगशी पोलिसांनी सांगितले.