कुंकळ्ळीत अपघात सत्र थांबेना; 26 वर्षीय तरुणी ठार

0
14

कुंकळ्ळीमध्ये अपघातांचे सत्र चालूच असून, काल कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक 26 वर्षीय तरुणी ठार झाली. काल दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात घडला. वृथा सिध्दया पै आंगले (सावरकट्टा, कुंकळ्ळी) असे मृत तरुणीचे नाव आहे.
विवेकानंद जयराम सावंत हे (58, रा. कुंकळ्ळी) हे आपल्या कारने केगदीकट्टा येथून कुंकळ्ळी येथे बाजारात निघाले होते. त्याचवेळी सालभड्डी-कुंकळ्ळी येथे समोरून येणाऱ्या दुचाकीला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली. त्यात वृथा ही खाली कोसळली आणि गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र तेथे डॉक्टरांनी तिला घोषित केले. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान, कुंकळ्ळी भागात मागील तीन दिवसांत झालेल्या चार अपघातात पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.