कितीही विरोध झाला तरी, सांगेत आयआयटी होणारच

0
19

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रकल्पाबाबत ठाम

कोणी कितीही विरोध केला, तरी सांगे येथे आयआयटी प्रकल्प होणारच, असे स्पष्ट करत, काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्या सहा महिन्यांत सांगे येथे आयआयटी प्रकल्पाची पायाभरणी होणार असल्याचे सुतोवाच केले.

काल सांगे येथे श्रीपाईकदेव नूतन मंदिराच्या पायाभरणी समारंभात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
सांगे येथील नियोजित आयआयटी प्रकल्पाला काही ठरावीक लोकच विरोध करीत आहेत; मात्र या लोकांचा विरोध असला तरी सांगेतील आयआयटी प्रकल्प रद्द केला जाणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

लोकांनी आयआयटीसारख्या प्रकल्पांना केवळ विरोधासाठी विरोध करू नये. लोकांनी पुढील २० वर्षांचा विचार करून आयआयटीला सहकार्य करावे. या प्रकल्पामुळे सांगे भागातील प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये यांचा विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच या शैक्षणिक प्रकल्पामुळे स्थानिकांनाही रोजगार प्राप्त होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.