काश्मीर, झारखंडमधील अंतिम टप्यातही जोरदार मतदान

0
68

जम्मू-काश्मीर व झारखंड राज्यांच्या विधानसभांच्या पाचव्या व अंतिम टप्प्यातील मतदानात काल जोरदार प्रतिसाद लाभला. दोन्ही ठिकाणी विक्रमी अनुक्रमे ६५ व ६६ टक्के असे विक्रमी मतदान झाले.
जम्मू-काश्मीरमधील गेल्या २५ वर्षातील हे सर्वाधिक मतदान ठरले. शहरांपेक्षा ग्रामीण भागांमध्ये अधिक संख्येने मतदान मतदानासाठी बाहेर आले. अनेक ठिकाणी सकाळी ८ वा. पासून रांगा लागलेल्या दिसून आल्या. कडाक्याची थंडी असूनही मतदारांनी उत्साह दाखवला. मतदान शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक उपायुक्त विनोद झुत्शी यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमध्ये यावेळी सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स, विरोधी पीपल्स डेमॉक्रेटिक फ्रंट व भाजप अशी तिरंगी लढत आहे.