काश्मीर खोर्‍यातील परिस्थिती खूप वाईट

0
156

>> गुलाम नबी आझाद यांचा दावा
काश्मीर खोर्‍यातील परिस्थिती खूप वाईट आहे असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांना सांगितले. घटनेतील ३७० कलम रद्दबातल झाल्यानंतर आझाद सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीने सहा दिवसांसाठी जम्मू-काश्मीरात आले आहेत.

प्रसारमाध्यमांना सध्या मी काही सांगू इच्छित नाही. आपण काश्मीरात चार दिवस राहिलो आणि आता जम्मूत दोन दिवसांसाठी आलो आहे. सहा दिवसांचा दौरा संपल्यानंतर आपल्याला जे काही सांगायचे आहे ते आपण पत्रकारांना सांगेन असे आझाद म्हणाले. आझाद हे जम्मू-काश्मीरचे आहेत.

काश्मीरात १० टक्के भागांतही
जाऊ शकलो नाही
आझाद यांनी म्हटले आहे की काश्मीरात मी ज्या ठिकाणी जायचे ठरवले होते त्यातल्या १० टक्के भागांनाही मी भेट देऊ शकलो नाही. त्यासाठी प्रशासनाने आपल्याला परवानगी दिली नाही असे आझाद म्हणाले. जम्मू-काश्मीरात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोठेही दिसले नाही असा दावा त्यांनी केला.