काश्मीरमध्ये सार्वमत घ्या : पाक लष्करप्रमुख

0
107

काश्मीर प्रश्नाची सोडवणूक होणे दक्षिण आशियातील शांततेच्या प्रस्थापनेसाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांनी काल केले. काश्मिरी जनतेला स्वयंनिर्णयाचा अधिकार बहाल करावा अशी मागणी त्यांनी केली. कोणत्याही आव्हानांस सामोरे जाण्यास पाकिस्तानी सैन्य सज्ज आहे असा इशाराही त्यांनी दिला. पाकिस्तानवर कोणीही आक्रमण केल्यास तोडीस तोड उत्तर दिले जाईल असेही ते म्हणाले.